शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mohali MMS Leak: मोहाली MMS कांडाचे धागेदोरे सैन्यापर्यंत; अरुणाचलप्रदेशमध्ये तैनात जवानाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:56 IST

लष्कर, आसाम आणि अरुणाचल पोलिसांच्या सहकार्याने चंदीगढ विद्यापीठ प्रकरणात एक महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी ट्विट केले आहे.

चंदीगढ विद्यापीठातील मोहाली एमएमएस कांड प्रकरणी पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सैन्य दलातील जवान संजीव सिंग याला अटक केली आहे. मोहाली एमएमएस कांडाचे धागेदोरे सैन्य दलापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणातील चौथा आरोपी संजीव सिंग याला CJM बोडाली यांनी मोहाली कोर्टात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमान्ड दिली आहे. यानंतर त्याला पंजाबमध्ये आणण्यात आले आहे. संजीवला पोलीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. लष्कर, आसाम आणि अरुणाचल पोलिसांच्या सहकार्याने चंदीगढ विद्यापीठ प्रकरणात एक महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी ट्विट केले आहे. संजीव सिंग याला अरुणाचल प्रदेशातील सेला पास येथून अटक करण्यात आली आहे. त्याला मोहाली कोर्टात हजर केले जाईल, असे ते म्हणाले. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी एमबीएच्या विद्यार्थिनीसह तीन आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. एमबीएची विद्यार्थिनी, तिचा प्रियकर सनी मेहता आणि तिचा मित्र रंकज वर्मा या तिन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत पोलिसांना अनेक तथ्य मिळाले आहेत. त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममधून इतर मुलींचे व्हिडिओ बनवल्याचा आरोप या एमबीएच्या विद्यार्थीनीवर आहे. हे व्हिडिओ ती तिच्या दोन मित्रांसोबत शेअर करायची. गर्ल्स हॉस्टेलमध्ये एमबीएची एक विद्यार्थिनी व्हिडिओ बनवत असताना तिला 6 मुलींनी पाहिले आणि या प्रकरणाची भांडाफोड झाली. 

हे प्रकरण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातही पोहोचले आहे. उच्च न्यायालयाच्या वकिलाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा जेणेकरून सत्य बाहेर येईल, असे या याचिकेत म्हटले आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी