शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:25 IST

Girl's High voltage drama in Chandigarh: पोलिसांना सूचना मिळाली की एक तरूणी अल्टो कारवर चढून गोंधळ घालत आहे. त्यानंतर महिला पोलीस आणि काही अधिकारी तिथे पोहोचले.

Girl's High voltage drama in Chandigarh: चंडीगढच्या सेक्टर ११/१२ च्या डिवायडिंग रोडवर बुधवारी रात्री एका तरूणीने कारवर चढून धिंगाणा घातला. पोलिसांनी मोठ्या मुश्कीलीने तरूणीला खाली उतरवलं आणि तिला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत की, तरूणीने नशा केला होता की नाही.

पोलिसांना सूचना मिळाली की एक तरूणी अल्टो कारवर चढून गोंधळ घालत आहे. त्यानंतर महिला पोलीस आणि काही अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी तरूणीला समजावून खाली उतरण्यास सांगितलं. पण तिने काही ऐकलं नाही. ती गाडीच्या छतावरच बसून होती. कधी उभी उभी राहत होती तर कधी झोपत होती. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी जमली होती.आरोप आहे की, तरूणी लोकांना काही आक्षेपार्ह इशारेही करत होती. महिला पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर तिला खाली उतरवलं. पोलिसांनी अल्टो कारच्या मालकाच्या जबाबावरून तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

पोलिसांनुसार ही तरूणी मंगळवारी पीजीआय चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. ती उत्तराखंडची राहणारी आहे. तिने फार्मसीचा कोर्सहीकेला आहे. गोंधळ घालणारी तरूणी काही दिवसांपूर्वी पीजीआयच्या आतील मेडिकल स्टोरमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती. नोकरी देण्याआधी तिला ट्रायलवर ठेवण्यात आलं. पहिल्या दिवशी ती कामावर गेली. पण दुसऱ्या दिवशी गेली नाही. नंतर तिने तिथे काम करण्यास नकार दिला. यानंतर तिने १०० नंबरवर कॉल केला तर पोलीस तिला चौकीत घेऊन गेले. तिथे तिने तक्रार दाखल केली की स्टोरमध्ये काम करणारा एक कर्मचारी तिच्यासोबत रेप करण्याचा प्रयत्न करत होता. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

अनेक लोकांनी सांगितलं की, या तरूणीने याआधीही एका ठिकाणी गोंधळ घातला होता. आता ती सेक्टर ११ मध्ये येऊन गोंधळ घालत आहे. तिथे उपस्थित लोकांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल