शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला एटीएम सेंटर फोडले, जीपला बांधून मशिन उखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:25 IST

शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डनसमोरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे संपूर्ण एटीएम मशिनच पळवून रोकड लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला

चाकण - येथील शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डनसमोरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे संपूर्ण एटीएम मशिनच पळवून रोकड लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम मशिन सोडून पोबारा केला. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसाच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. ५) पहाटे तीनच्या सुमारास माणिक चौकाजवळील शिक्रापूर रस्त्यावरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये घडली. चोरट्यांनी एटीएम मशिन पिकअप जीपला दोरीने बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायरनचा मोठमोठ्याने आवाज सुरू झाल्याने चोरट्यांचा प्लॅन फसला. कॅमेऱ्यामध्ये आपण कैद होऊ नये, म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयावर काळ्या रंगाचे स्प्रे मारले होते.घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता एका पिकअप जीपने चेहºयाला रुमाल बांधलेले चार जण एटीएम सेंटरसमोर आले. एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयावर चोरट्यांनी काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर एटीएम सेंटरच्या बाहेर उभ्या केलेल्या पिकअप जीपला दोरीच्या साह्याने एटीएम बांधले व एटीएम मशिन उखडण्याचा प्रयत्न केला. या वेळी एटीएम सेंटरमधील सायरनचा आवाज सुरू झाल्याने चारही चोरट्यांनी एटीएम मशिन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.एसजीएस कंपनीचे अधिकारी प्रकाश हिरामण पाटील (वय ३५, रा. वडगावशेरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत चाकण ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश पाटील यांना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास एसजीएस कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयातून फोन आला, की चाकण येथील एचडीएफसीच्या एटीएम सेंटरमध्ये काही संशयास्पद हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChakanचाकण