शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असलेला हवाला मध्यस्थी जेरबंद; डीआरआयची कारवाई   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:38 IST

ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून न्हावा-शेवा बंदरातील ९ हजार मेट्रीक टन डिझेल तस्करीतील ही रक्कम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होता.जितेंद्र परमार (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

ठळक मुद्देजितेंद्र परमार (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्येक दिऱ्हममागे (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) जितेंद्रला १० पैसे कमीशन मिळत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.

मुंबई - हायस्पीड डिझेलच्या तस्करीचे २० कोटी रुपये हवालामार्फत संयुक्त अरब अमिरातीला पाठवणाऱ्या मध्यस्थाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून न्हावा-शेवा बंदरातील ९ हजार मेट्रीक टन डिझेल तस्करीतील ही रक्कम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होता.जितेंद्र परमार (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

हवालामार्फत पाठवण्यात आलेल्या पैशामध्ये प्रत्येक दिऱ्हममागे (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) जितेंद्रला १० पैसे कमीशन मिळत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. तस्करीच्या मार्गाने न्हावा-शेवा बंदरात ९ हजार मेट्रीक टन डिझेल आणण्यात आले होते. याची किंमत ३७ कोटी रुपये असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीतील तेल शुद्धीकरण कारखान्यातून हे डिझेल रसायनांच्या नावाने न्हावा-शेवा बंदरात येते. तेथे कच्च्या तेलाची भेसळ करून हे डिझेल टॅंकरमधून मुंबई, नवी मुंबई व ठाण्याला पाठवण्यात येते. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्यामुळे भेसळयुक्त डिझेलला मोठी मागणी आहे. तस्करांना लिटरमागे १० ते २० रुपये मिळतात. ऑटोस्टार लुब्रिकंट्‌स अँड ग्रुप, ऍलोरा पेट्रोकेमिकल्स व फ्लेक्‍झी इंडिया यांनी हे डिझेल आणले होते. त्यांच्यामार्फत ही रक्‍कम जितेंद्र परमारला मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे. जितेंद्र हा हवाला ऑपरेटर वांद्रे पश्‍चिम येथील रहिवासी असून जितेंद्रने हवाला पद्धतीने २० कोटी रुपये संयुक्त अरब अमिरातीला पाठवले होते. तेव्हापासून तो केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आला होता. त्याच्यावर पाळत ही ठेवण्यात आली होती. हवालामार्फत पाठवण्यात आलेल्या रक्कमेच्या व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे डीआरआयने ताब्यात घेतल्यानंतर उघड झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयArrestअटकCrude Oilखनिज तेल