शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

CCTV दुरूस्त करणाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये घेतला अ‍ॅक्सेस, रेकॉर्ड केले कपलचे खाजगी क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 10:49 IST

दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून राशिद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोप आहे की, राशिदने दिल्लीमध्ये एका घरात सीसीटीव्ही ठीक करण्याच्या बहाण्याने त्याचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर तो सीसीटीव्हीतून घरात असलेल्या पती-पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ तो त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होता. इतकंच नाही तर नंतर तो कपलला ब्लॅकमेल करत लाखो रूपयांची मागणी करत होता. 

दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा ज्या कंपनीने लावला होता त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार केल्यावर कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा ठीक करण्यासाठी एक टेक्नीशिअन पाठवला. (हे पण वाचा : बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...)

मात्र, या दरम्यान टेक्नीशिअनने कॅमेरा ठीक करत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस त्याच्या मोबाइलमध्ये घेतला आणि तेथून निघून गेला. काही महिन्यांनी दाम्पत्याच्या मोबाइलवर त्यांचेच प्रायव्हेट व्हिडीओ येऊ लागले आणि सोबतच धमकी देत म्हणाला की, ३ लाख रूपये द्या नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणार.

पोलिसांनी तपास करत राशिदला बंगळुरूहून अटक केली. राशिद मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. आधी राशिद दिल्लीमध्ये काम करत होता आणि त्यादरम्यानच त्याने हा प्रकार केला होता. लॉकडाऊननंतर तो नोकरी सोडून बंगळुरूला नोकरी करण्यासाठी गेला होता. (हे पण वाचा : गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड)

पीडित पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. मुलगी घरात एकटी राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी एक मेड ठेवलेली आहे. त्यामुळे घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. मात्र, आरोपी राशिदने सीसीटीव्हीसोबत छेडछाड करत त्याचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला होता. त्यानंतर दाम्पत्याचे प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.

सध्या पोलिसांनी आरोपीचा मोबाइल सीज करण्यात आला आहे. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे आणि जाणून घेतलं जाणार आहे की, त्याने असा प्रकार आणखी कुठे कुठे केलाय. सोबतच कधीपासून हे करत आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही