शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CBI Bike Boat Scam: धक्कादायक! सीबीआयने उघडकीस आणला 15 हजार कोटींचा महाघोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 06:13 IST

‘बाईक बॉट’ प्रकरणात २ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा सीबीआयने उत्तर प्रदेशात उघडकीस आणला आहे. मोटारसायकल (बाईक) टॅक्सी सेवेच्या नावाखाली गुंतवणूक योजना राबवून देशभरातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १५ हजार कोटी रुपयांना फसविण्यात आले असून ‘बाईक बॉट’ नावाने हा घोटाळा आता गाजू लागला आहे.गर्वित इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. (जीआयपीएल) या कंपनीचा प्रवर्तक संजय भाटी आणि इतर १४ जणांवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी ईडीनेही चौकशी केली असून २१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

संजय भाटी हा बाईक बॉट कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहे. कंपनीच्या जाहिरातीनुसार, या योजनेत गुंतवणूकदार एक, तीन, पाच अथवा सात बाईकमध्ये गुंतवणूक करू शकत होते. कंपनी या बाईक भाड्याने देऊन गुंतवणूकदारास मासिक भाडे, ईएमआय आणि अधिक बाईक असल्यास बोनस देणार होती.  गुंतवणूकदाराने साखळी पद्धतीने इतर गुंतवणूकदार आणल्यास त्यावर प्रोत्साहन लाभ दिला जाणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू झालेली  २०१९ पर्यंत सुरू होती. 

देशभरामधून आल्या तक्रारीलोकांनी योजनेत गुंतवणूक केली, पण कंपनीने त्यांना परतावा दिलाच नाही. लोकांच्या मूळ रकमाही कंपनीकडे अडकून पडल्या. असंख्य तक्रारी देशभरातून यायला लागल्यानंतर प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थांकडे देण्यात आला.  ‘बाईक बॉट’ घोटाळ्यात सुमारे २ लाख गुंतवणूकदारांना गंडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग