शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयने आपल्याच डीएसपीला केली अटक; छाप्यात ३.८५ कोटींची रोकड जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 06:48 IST

अटक केलेल्यांमध्ये एनसीएलच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एनसीएल ही कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत 'मिनी रत्न' कंपनी आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील सिंगरौलीतील 'नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड' (एनसीएल) मध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने स्वतःच्याच पोलिस उपअधीक्षकासह (डीएसपी) पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एनसीएलच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एनसीएल ही कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत 'मिनी रत्न' कंपनी आहे. सीबीआयने १७ ऑगस्ट रोजी नोएडाव्यतिरिक्त सिंगरौली आणि जबलपूर येथे छापे टाकले होते. यात ३.८५ कोटी रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. ही रक्कम एनसीएलच्या कामातील फायद्यांच्या बदल्यात अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती.

एनसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांचे खासगी सचिव आणि व्यवस्थापक (सचिवालय) सुभेदार ओझा, एनसीएलचे माजी सीएमडी भोला सिंग आणि सध्याचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या घरी झडती घेण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जबलपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) जॉय जोसेफ दामले, एनसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांचे खासगी सचिव सुभेदार ओझा, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) लेफ्टनंट ले. कर्नल निवृत्त) बसंत कुमार सिंग, संगम इंजिनिअरिंगचे संचालक आणि कथित मध्यस्थ रविशंकर सिंग आणि त्यांचा सहकारी दिवेश सिंग यांचा समावेश आहे.

नेमके काय केले? रविशंकर सिंग विविध कंत्राटदार, व्यापारी आणि एनसीएलच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये 'मध्यस्थ' म्हणून लाच व्यवहारात मदत करत होते. दामले यांना तपास दाबण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच देताना दिवेश सिंगला रंगेहात पकडण्यात आले. रविशंकर सिंग यांच्या सूचनेनुसार त्यांचा कर्मचारी अजय वर्मा याने लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) बसंत कुमार सिंग यांच्याकडून ५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग