शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या वीज तारेची विक्री पकडली, सहा जणांकडून मारहाण

By अनिल गवई | Updated: May 6, 2024 13:58 IST

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा

खामगाव : चोरीच्या वीज तारेची विक्री करताना पकडून फोटो काढल्याने एकास सहा जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी उशिरा रात्री स्थानिक टिळक मैदान परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, अब्दुल रहमान अब्दुल सत्तार (५४) यांना टिळक मैदानावरील एका दुकानात चोरीच्या वीज तारेची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेवून छायाचित्र संकलित केले. त्यामुळे चिडून जात जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान या तिघांनी मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटत पळ काढल्यानंतर जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान, हसनैन खान जफर खान, जुनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान पाठलाग करीत असताना एका डेअरीजवळ थांबले. 

आरोपीही तेथे आले. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ मोहम्मद सादिक अब्दुल गफ्फार, मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान, जुलेखां बानो अब्दुल रहमान यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. यात मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान यास मुजफ्फर खान सत्तार खान याने तर अजिम खान फिरोज खान याने मुलाच्या डाव्या पायावर पाइप मारून त्यास जखमी केले. त्याचवेळी भावाला जुनैन खान जफर खान याने छातीवर काठीने मारले.

तसेच हसनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान यांनी फिर्यादीसोबतच त्यांच्या पत्नीला मारहाण करून खिशातील दुकानातील गल्ल्याचे २२ हजार आठशे रुपये शर्टाचा खिसा फाडून काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९ सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

पैशांच्या व्याजासाठी मारहाणत्याचवेळी जफर खान सत्तार खान (५२) यांनी तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्या मुलाने अ. रहमान अ.सत्तार यांच्याकडून मोबाइल घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले. या पैशांच्या व्याजासाठी अब्दुल रहमान अब्दुल सत्तार, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल, फैजान मेमन अब्दुल रहमान, दानीश मेमन सादीक मेमन यांनी संगनमत करून शिवीगाळ व मारहाण केली. तर, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल या तिघांनी लोखंडी सळईने हल्ला चढविला. त्याचवेळी फैजान मेमन अब्दुल रहमान आणि दानीश मेमन सादीक मेमन या दोघांनी पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. त्यावरून पोलीसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९, सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी