शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या पैशातून कॅशियर १८ लाखांचा जुगार खेळला आणि सकाळी फरार झाला, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:41 IST

Crime News: जुगाराचा नाद कुठल्याही व्यक्तीला बरबाद करू शकतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील रायपूर येथून समोरआली आहे. येथे जुगारामुळे एका मोटार कंपनीत कॅशियर असलेल्या एका व्यक्तीने कंपनीला १८ लाखांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे.

रायपूर - जुगाराचा नाद कुठल्याही व्यक्तीला बरबाद करू शकतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील रायपूर येथून समोरआली आहे. येथे जुगारामुळे एका मोटार कंपनीत कॅशियर असलेल्या एका व्यक्तीने कंपनीला १८ लाखांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. या कॅशियरचे नाव अजय गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आता कंपनीने अजय गुप्ताविरोधात तक्रार दिली आहे. तसेच पोलीस अजय गुप्ताचा शोध घेत आहेत. कॅशियरने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. आता आरोपी कॅशियर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिवनाथ मोटर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये अजय गुप्ता कार्यरत होता. त्याने लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. रोख रक्कम जमा करणाऱ्या ग्राहकांकडून तो पावती द्यायचा. मात्र नंतर ती पावती रद्द करायचा.

अशा प्रकारे आरोपी अजय गुप्ताने कंपनीची एकूण १८ लाख ३४ हजार ५५० रुपयांची रक्कम उडवली होती. सध्या पोलिसांनी शिवनाथ मोटर्सच्या व्यवस्थापकीयसंचालकांच्या तक्रारीनुसार अजय गुप्ताविरोधात अफरातफरीचा गुन्हा नोंद केला.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या अकाऊंटचे डिटेल तपासले तेव्हा सदर कॅशिअरने रमीसारख्या ऑनलाईन गेमवर पैसे गमावल्याचे दिसून आले. लाखो रुपये ऑनलाईन गेमवर पैसे लावण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड