शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 07:32 IST

मुंबई, ठाण्यात एटीएस, दिल्ली पोलिसांची शोध मोहीम; दहशतवादी कारवायांचा संशय; दोघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून तब्बल ६५० कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध रोकड, अमली पदार्थ व मद्य जप्त करण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक जप्ती एकट्या पश्चिम बंगालमधून केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार होती, असा दावा या जप्तीसंदर्भात माहिती देताना निवडणूक आयोगाने केला.

पश्चिम बंगालमधून ३१९ कोटींची अवैध रोकड, अमली पदार्थ, दारू व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले. त्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १७० कोटी जप्त करण्यात आले. उर्वरित १६१ कोटी रुपयांची अवैध रोकड विधानसभा निवडणूक होत असलेल्या केरळ, आसाम व पुद्दुच्चेरी येथून जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या तक्रारींवर १०० मिनिटांच्या आत कारवाई निश्चित करण्यासाठी चार राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी ५,१७३ हून अधिक भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबई, ठाण्यात छापेमारी करत दोन संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा नोंदवत पुढील तपासासाठी दोघांना दिल्लीत नेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याचे एटीएस सूत्रांकडून समजते.

हे तरुण एका दहशतवादी संघटनेच्या ओडिशा मॉड्यूलचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑनलाइन साहित्याद्वारे तरुणांमध्ये ‘जिहादी’ विचाराद्वारे माथी भडकावत होते. तसेच या दोघांनी अन्य साथीदारांसोबत घातपाती कृत्याचा कट आखला होता. अटक आरोपींमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹650 Crore Seized in Election States; Two Arrested for Terrorism

Web Summary : Over ₹650 crore in cash, drugs, and liquor seized across four election-bound states and a Union Territory, with West Bengal accounting for the largest share. Separately, two suspects were arrested in Mumbai and Thane for alleged terror links and conspiracy, linked to an Odisha module.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी