शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:01 IST

त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.

बीड : जिल्हा रुग्णालयात शिकाऊ असलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने छेड काढली होती. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जावून त्याला चोप दिला होता. आता याच प्रकरणात पीडितेने पेठबीड पोलीस ठाण्यात शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय ४७) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केल्यानंतर  न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामिनही दिला आहे.

सध्या कोरोना महामारीत सर्वच जण जीव ओतून काम करीत आहे. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शिकाऊ विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. बीड जिल्हा रुग्णालयातही शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी कर्तव्य बजावतात. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता पीडित विद्यार्थिनी कार्यालयीन कामकाजासाठी गेली होती. याचवेळी येथील कर्मचारी शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय ४७) याने तिची छेड काढली. त्यानंतर या विद्यार्थिनीने जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. यात त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे. तर पुढील कारवाईसाठी अहवाल उपसंचालकांकडे पाठविला आहे. दरम्यान, चौकशी पूर्ण होताच पीडितेने पेठ बीड पोलीस ठाणे गाठून शेख विरोधात तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामिन मंजूर झाल्याचे तपास अधिकारी सपोनि भारती यांनी सांगितले.

तक्रार द्यायला आला अन् अटक केलाशेख हा मारहाण झाली म्हणून पेठबीड पोलीस ठाण्यात आला होता. तेवढ्यात पीडिताही ठाण्यात आली आणि तक्रार दिली. त्याच क्षणी पोलिसांनी त्याला अटक केली. 

पीडितेच्या पतीविरोधातही गुन्हारुग्णालयात येऊन पत्नीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याने तिच्या पतीविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्यालाही अटक केल्याचे पोनि विश्वास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडsexual harassmentलैंगिक छळ