शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल, नितीन गडकरींचा भाऊ असल्याची केली बतावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 06:14 IST

Crime News : अमोल पळसमकर यांनी ही तक्रार दिली. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली.

डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे भाऊ आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतो ते कमी किमतीत ओळखीने मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अशी बतावणी करीत एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून राजन गडकरी आणि आनंद गडकरी या बाप-लेकाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अमोल पळसमकर यांनी ही तक्रार दिली. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली. पुढे ७ फेब्रुवारी २०२० रोजी अमोल हे गडकरी यांच्या घरी गेले असता राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने त्यांना आमचे डोंबिवली स्टेशनला सोन्याचे दुकान आहे. माझे भाऊ नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री आहेत. 

आयकर विभाग जे सोने जप्त करतात ते कमी किमतीत तुम्हाला ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, असे गडकरी पिता-पुत्रांनी पळसमकर यांना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पाच लाखांचा चेक दोघांना सुपूर्द केला. एक ते दोन महिन्यांत तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन यांनी सांगितले; परंतु दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. गडकरी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने अमोल गावी निघून गेले. २५ मे रोजी ते पुन्हा पैसे मागण्यासाठी गडकरी यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब घर सोडून गेल्याची माहिती शेजाऱ्यांकडून अमोल यांना मिळाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली. या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

गडकरी कुटुंब बेपत्ता, सुनेची पोलीसात तक्रार- राजन, त्यांची पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातू रुग्वेद, असे २४ मेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार सून गीतांजली गडकरी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. - लहान मुलाला दवाखान्यात डोस देण्यास घेऊन जातो असे सांगून घराबाहेर पडले ते आजतागायत आले नसल्याचे गीतांजली यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली