शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 18:48 IST

Crime News : महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज कंपनीच्या प्रवेशद्वार समोरील नाल्यात घातक रसायन सोडणाऱ्या टँकरला कंपनी सुरक्षा रक्षकांनी पकडला. टँकर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला असून महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज प्रवेशद्वार समोर एक टँकर दोन दिवसांपूर्वी उभा होता. टँकर व शेजारील गटारातून दुर्गंधी येत असल्याने, कंपनी सुरक्षरक्षकांनी चौकशी केली. तेंव्हा टँकरचा चालक पळून जाण्याचा यशस्वी झाला. टँकर व गटारातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला दिली. कंपनीने उल्हासनगर पोलीस ठाण्याला माहिती देऊन टँकर ताब्यात घेण्याचे सांगितले. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने, स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात व अन्य गटारीत घातक रसायन सोडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात कैलास कॉलनी, भरतनगर परिसरात नदी पात्रातील उग्र दर्पमुळे शेकडो नागरिकांना डोळे चुरचुरने, डोके दुखी, दम, श्वास लागणे आदी त्रास झाल्याने, नागरिक रस्त्यावर आली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, प्रदूषण मंडळ अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिसांनी दोन रात्री जागून काढून नदी किनारी वॉच ठेवला. मात्र हाती काहीच लागले नाही. स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. प्रदूषण मंडळांनी आनंदनगर एमआयडीसी मधील एका कंपनीला नोटीस पाठविले असून नदीचे पाणी अद्यापही रंगहीन आहे. दर पाच मिनिटांनी नदीचे पाणी रंग बदलत असल्याने नदी किनारील कंपनीच्या चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.नदीत रसायन सोडणारे रॅकेटशहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात वर्षानुवर्षे इतर ठिकाणाहून टँकरने आणलेले घातक व विषारी रसायन टाकले जाते. रसायन टाकताच किनारील परिसरात उग्र दर्पमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन, डोके दुखी, डोळे चुरचुरने, उलट्या आदी त्रास होतो. नदी पात्रात टँकरने इतर ठिकाणाहून आणलेले रसायन टाकण्यात येत असून त्यांचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगर