शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटी प्रकरणी आसाम रायफलच्या जवानास अटक, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 06:00 IST

लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे  - लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे. त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांपैकी तो सोळावा, तर लष्करातील चौथा आरोपी ठरला आहे.दीड वर्षापूर्वी नागपूर, पुणे आणि गोवा येथे लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटला होता. या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि रवींद्र दौंडकर यांच्या वेगवेगळ्या पथकांनी लष्करातील तीन कर्मचाºयांसह १५ जणांना अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या अधिपत्याखालील पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.आसाम रायफलमध्ये हवालदार असलेल्या धाकलू याचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. तो आसाम रायफलच्या नागालॅण्ड येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये असल्याचे उघड झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने नागालॅण्ड येथून ३० आॅक्टोबर रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तेथील स्थानिक न्यायालयाने त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत ट्रान्झिट कस्टडी दिली. ठाणे न्यायालयाने शनिवारी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.धाकलूविरुद्ध वॉरंटधाकलू हा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. तो आसाम रायफलच्या प्रशिक्षण केंद्रात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अखेर ठाणे पोलिसांनी अटक केली.काय होते पेपरफुटीचे प्रकरण? लष्कर भरतीसाठी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेपूर्वीच म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी नागपूर, पुणे आणि गोवा या परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटला होता. ज्यांनी हे पेपर आधीच खरेदी केले, त्या उमेदवारांना या तिन्ही केंद्रांवरील एका हॉलमध्ये बोलवून परीक्षेतील प्रश्न सांगितले जात होते. हे प्रश्न त्यांच्याकडून लिहून घेतले जात असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांनी या तिन्ही ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकून हा पेपर घोटाळा उघड केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे