शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेमस मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात गुन्हा; दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:02 IST

रागाच्या भरात विवेकने यानिकाला खोलीत बंद केले, त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाण केली असा आरोप आहे.

नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा इथं आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने दिली आहे. विवेक बिंद्रा यांनी पत्नी यानिकाला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे. यानिकाला शिवीगाळ करत तिचा शारीरिक छळ विवेक बिंद्रा यांनी केल्याचे म्हटलं आहे. 

तक्रारीनुसार, विवेक यांनी यानिकाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली. तिचा मोबाईल फोडून टाकला. या मारहाणीत यानिकाच्या कानाचा पडदा फाटका. त्यानंतर आता विवेक बिंद्राविरोधात नोएडा येथे गुन्हा दाखल झाला आहे. ६ डिसेंबरला विवेकचं यानिकासोबत लग्न झाले होते. त्यानंतर ८ डिसेंबरला ही मारहाणीची घटना घडली. त्यानंतर यानिकावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यानिकाचे भावाने १४ डिसेंबरला विवेक यांच्याविरोधात तक्रार दिली. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यात विवेक बिंद्रा सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. 

विवेक बिंद्रा हे बडा बिझनेसचे सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव बडा बिझनेस असे आहे. या कंपनीत लोकांना इंटरप्रेन्योरशिप आणि व्यवसायिक ट्रेनिंग आणि सल्ले दिले जातात. या कंपनीचा टर्नओव्हर ५० कोटी इतका असल्याचे बोलले जाते. विवेक बिंद्रा हे युट्यूबवर खूप प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या चॅनेलला २१.४ मिलियन म्हणजे २ कोटीहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीने भावाने आरोप केलेत, त्यात म्हटलंय की, माझी बहीण यानिका हिचे ६ डिसेंबरला विवेक बिंद्रासोबत ललित मानगर हॉटेलमध्ये लग्न झाले. विवेक सध्या सेक्टर ९४ येथील सुपरनोवा वेस्ट रेजीडेंसीमध्ये राहतात. लग्नाच्या दोन दिवसांनी ८ डिसेंबरला सकाळी ३ वाजता विवेक त्यांच्या आईसोबत वाद घालत होते. तेव्हा त्यांची पत्नी यानिका तिथे पोहचल्या. आई-मुलाचा वाद सोडवण्याचा यानिकाने प्रयत्न केला. परंतु विवेक पत्नी यानिकावर संतापले.

रागाच्या भरात विवेकने यानिकाला खोलीत बंद केले, त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तिचा मोबाईल तोडला. तिचे केस ओढले. या मारहाणीत यानिका जखमी झाली. डोक्याला मार लागल्याने तिला चक्कर आली. कानाने काही ऐकायला येत नव्हते. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानिकाने भावाला फोन केल्यानंतर जेव्हा भाऊ वैभव यानिकाच्या घरी पोहचला तेव्हा हा प्रकार उघड झाला. या मारहाणीच्या घटनेने माझ्या बहिणीला वेदना झाल्या आहेत. तिची मानसिक स्थिती ढासळली आहे असं वैभवने म्हटलं. 

पहिल्या पत्नीसोबत कोर्टात वादविवेक बिंद्रा मोटिवेशनल स्पीच आणि सल्ला देण्याचे काम करतात. परंतु त्यांचा संसार सुरळीत चालवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांची पहिली पत्नी गीतिका सबरवाल यांच्यासोबतही त्यांचा वाद सुरू आहे. सध्या हा वाद कोर्टात आहे. गीतिकाने पती विवेककडून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप केला आहे. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात आहे. या दोघांना एक मुलगाही आहे. पहिल्या पत्नीच्या वादानंतर विवेकने यानिकासोबत दुसरे लग्न केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी