शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सावधान! गुगल सर्च करताय, तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 13:19 IST

गुगलवर सर्च करुन कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला त्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले.

नवी दिल्ली - आपल्याला कधी कोणत्या गोष्टीची माहिती हवी असल्यास सर्वात आधी आपण गुगलवर सर्च करतो. अनेकदा बँकेबाबत काही तक्रार असल्यास गुगलवर सर्च करुन ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे संपर्क शोधले जातात. मात्र हे करताना तुमची एक चूक महागात पडू शकते. कारण हॅकर्सकडून हेल्पलाइन नंबर गुगलवर शेअर केल्याने त्याद्वारे तुमची फसवणूक करणारी टोळी सक्रीय आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च करुन चुकीच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधल्यास तुम्ही हॅकर्सचा शिकार होऊ शकता. 

बंगळुरुमधील एका महिलेसोबत अशी घटना घडली आहे. तिने गुगलवर सर्च करुन कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला त्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले. महिलेने तिच्या फूड ऑर्डरचा रिफंड घेण्यासाठी चुकून फेक झॉमेटो कॉल सेंटरवर फोन केला त्यानंतर तिची ही फसवणूक झाली. गुगलवर सर्च करुन तिने मिळालेल्या नंबरवर डिटेल्स पाठविल्या त्यानंतर तिच्या बँक अकाऊंटमधून रक्कम काढण्यात आली. 

अशाच एक प्रकार चेन्नईमध्येही घडला. फेक नंबरवर कॉल केल्यानंतर त्या महिलेकडून यूनीफाइड पेमेंट इंटरफेस(यूपीआय) पिन, पासवर्ड आणि बँक डिटेल्स मागण्यात आले. त्यावेळी त्या महिलेला शंका आल्याने महिलेने चुकीचा पिन समोरील माणसाला सांगितला. कॉल ठेवल्यानंतर त्या महिलेच्या मोबाईलवर मॅसेज आला की त्यांच्या खात्यातून 5 हजाराचा व्यवहार चुकीचा पिन टाकल्याने रद्द केला आहे. 

अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधाफूड डिलिव्हरी झॉमेटोकडून पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फेक कॉल सेंटरविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून असे प्रकार समोर आलेले आहेत. ज्यामध्ये फेक कॉल करुन ग्राहकांकडून बँकेचे डिटेल्ससह पिन मागविले जातात त्यातून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे गुगलवर कोणतीही गोष्ट सर्च करताना अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करुन घ्या. बँकेचे डिटेल्स कोणालाही पाठवू नका. खातरजमा केल्याशिवाय अज्ञात व्यक्तींना संपूर्ण माहिती, बँकेचे पिन न देता तुमची फसवणूक टाळली जाऊ शकते. 

टॅग्स :fraudधोकेबाजीgoogleगुगलPoliceपोलिसbankबँक