शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मोठ्या मुलाची मृत्यूशी झुंज; आई-वडील भीषण अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:31 IST

car accident: शहरातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे विजय खंडारे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी सहभागी होत असत. सोमवारी दिवसभर त्यांनी दुकानातील व्यवहार केले. भेटलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. यानंतर काही तासांत अपघातात कुटुंब उद्ध्वस्त झाले.

दर्यापूर (अमरावती) : भरधाव कार अपघातग्रस्त होऊन एका दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा व चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास दर्यापूर-अकोला मार्गावरील तोंगलाबाद-सौंदळी फाटा मार्गावर हा अपघात घडला. विजय खंडारे (४८) व वृषाली विजय खंडारे (४५, रा. जागृती कॉलनी, बनोसा, दर्यापूर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. खंडारे हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते.     

अपघातात गंभीर जखमी झालेला पार्थ विजय खंडारे (१६), वाहनचालक मंगेश घोडस्कर (३८, रा. दर्यापूर) यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. मात्र, खंडारे यांच्या कारची अवस्था पाहता, त्यांचे वाहन समोरच्या एखाद्या मोठ्या वाहनावर मागून आदळले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शहरातील दिलीप एजन्सीचे संचालक असलेले विजय खंडारे हे पत्नी आणि पार्थ आणि अंशु (५) या दोन मुलांसह सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अहमदनगरजवळ मंगळवारी होणाऱ्या महानुभावपंथीयांच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एमएच २७ एआर ८२५९ क्रमांकाच्या कारने दर्यापूरहून निघाले होते. दर्यापूरहून १२ किलोमीटर अंतरावरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्यानजीक त्यांची कार अपघातग्रस्त झाली. यात मागील सीटवर बसलेल्या खंडारे दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने अकोल्याला हलविण्यात आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

कुटुंब उद्ध्वस्त

शहरातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे विजय खंडारे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी सहभागी होत असत. सोमवारी दिवसभर त्यांनी दुकानातील व्यवहार केले. भेटलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. यानंतर काही तासांत अपघातात कुटुंब उद्ध्वस्त झाले.

पार्थची मृत्यूशी झुंज

अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला विजय खंडारे यांचा मोठा मुलगा पार्थ हा मृत्यूशी झुंज देत आहे. पाच वर्षांचा अंशु हा नातेवाइकांना ‘आई बाबा कुठे गेले? मला त्यांच्याजवळ जायचे आहे’, असा आग्रह धरत आहे. तुझे आईबाबा आता दूरच्या प्रवासाला निघून गेलेत, ते आता नाही परतणार, हे त्या अबोध चिमुकल्याला सांगायचे तरी कसे, अशी शोकविव्हळ परिस्थिती आप्तांवर येऊन ठेपली आहे.

टॅग्स :Accidentअपघात