शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

High Court: शरीर संबंध ठेवण्यासाठी आधारकार्ड दाखवावे लागणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:32 IST

दिल्ली पोलिस प्रमुखांना या प्रकरणी विस्ताराने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने सहमतीने शरीरसंबंध ठेवण्यावरून महत्वाची टिपण्णी केली आहे. जर एखादी व्यक्ती सहमतीने शरीर संबंध ठेवत असेल तर त्या व्यक्तीला किंवा पार्टनरला एकमेकांचे आधार, पॅन तपासून पाहण्याची गरज नाहीय, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका हनीट्रॅपच्या प्रकरणात न्यायालयाने ही टिपण्णी केली आहे. तसेच एका व्यक्तीला या प्रकरणी जामिनही दिला आहे. 

दिल्ली पोलिस प्रमुखांना या प्रकरणी विस्ताराने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. बलात्काराचा आरोप केलेली, एफआयआर दाखल करणारी 'पीडित' स्त्री ही नेहमीच असे पुरुषांविरोधात आरोप करते का, हे देखील तपासण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंह म्हणाले की, जर एखादी व्यक्ती दुस-यासोबत सहमतीने संबंध ठेवत असेल तर त्याला दुसऱ्याचे वय तपासण्याची गरज नाही. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेचे वय तपासण्यासाठी त्याला त्याचे पॅन किंवा आधार कार्ड पाहण्याची गरज नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. 

एका महिलेने दावा केला आहे की जेव्हा तिने पहिल्यांदा संमतीने लैंगिक संबंध ठेवले तेव्हा ती अल्पवयीन होती. त्यानंतर आरोपीने तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या वक्तव्यात अनेक विरोधाभास असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याशिवाय आरोपीकडून महिलेच्या खात्यात गेल्या वर्षभरात 50 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. एफआयआर नोंदवण्‍याच्‍या एक आठवड्यापूर्वी शेवटचे पेमेंट केले गेले होते आणि आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा लागू केला होता.

आरोपीची बाजू मांडणारे वकील अमित चड्ढा म्हणाले की, महिलेच्या तीन वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. आधार कार्डानुसार तिचा जन्म वाढदिवस 1 जानेवारी 1998 आहे, तर पॅन कार्डमध्ये 2004 आहे. पोलिसांनी तपास केला असता तिची जन्मतारीख 2005 असल्याचे निष्पन्न झाले. 

यावरून आधार कार्डवर नमूद केलेल्या जन्मतारखेनुसार त्या पुरुषाचे कोणत्याही अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध नसल्याचे दिसून येते. न्यायालयाने जून 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत महिलेच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर केल्याचाही उल्लेख केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAdhar Cardआधार कार्ड