शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

…अन् काही सेकंदात आर्किटेक्टचा जीव गेला; अंगावर थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

By प्रविण मरगळे | Updated: December 19, 2020 14:18 IST

पलासिया ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी ही घटना घडली, या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर थरकाप उडेल. 

इंदौर – मध्य प्रदेशातील इंदौर पलासिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून कार चालक आणि दुचाकीस्वारामध्ये धक्काबुक्की झाली, यावेळी कारचालकाला धक्का बसल्याने तो खाली पडला, दुर्दैवाने यावेळी दुसरीकडून वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने कार चालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, घडलेला प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.

पलासिया ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी ही घटना घडली, या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर थरकाप उडेल. कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर कार चालक सिद्धार्थ सोनी आणि दुचाकीस्वार विकास यादव यांच्यात वाद झाला, हा वाद इतक्या विकोपाला गेला की, दोघांमध्ये झटापट झाली, याचवेळी रस्त्यावरून ट्रक जात होता, झटापटीत आर्किटेक्ट सिद्धार्थ सोनी रस्त्यावर पडला आणि ट्रकने सिद्धार्थला चिरडलं, त्यात त्याचा मृत्यू झाला.

सिद्धार्थचं २ वर्षापूर्वीच लग्न झालं होतं, २६ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, सिद्धार्थचे वडील डिटर्जेंट पावडरचा कारखाना चालवतात. घरात आई, पत्नी, लहान बहीणदेखील आहे. सिद्धार्थ आर्किटेक्ट होता आणि शहराच्या स्मार्टसिटी प्रकल्पात तो काम करत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

इंदौरमध्ये गुरूवारी एका युवकाचा झटापट सुरु असताना घडलेल्या प्रकारामुळे मृत्यू झाला, काळ बनून मृत्यूने युवकावर घाला घातला, इंदौरच्या पलासियाच्या परिसरातील पत्रकार कॉलनीतील चौकात ही घटना घडली, कॅनरा बँकेच्याजवळ एक कार चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला, त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला दोघांमध्ये झटापट झाली, या धक्काबुक्कीत कार चालक रस्त्यावर पडला, तेव्हा वेगाने येणाऱ्या ट्रकने कार चालकाला चिरडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

पलासिया पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींकडून आम्हाला माहिती मिळाली, प्राथमिक तपासात सिद्धार्थ सोनी त्यांच्या कारने जात होते, विकास यादव समोरून येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अ‍ॅक्टिव्हाला गाडी धडकल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादावादीत दोघांमध्ये झटापट झाली, त्याचवेळी एक ट्रक बाजूने जात होता. या दरम्यान कार चालक सिद्धार्थ सोनी रस्त्यावर पडला आणि ट्रकचे चाक त्याच्या अंगावर चढले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बिछौली गावचा रहिवाशी आरोपी विकास यादव याला या प्रकरणात गुन्हेगार म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी ट्रकने उडवलेल्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी पकडले आहे.

पालासिया पोलीस स्टेशनचे प्रभारी संजयसिंग बैस यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरण गुन्हेगारी मानसिकतेच्या प्रकारात मोडते, त्यामुळे ट्रक चालक आणि अ‍ॅक्टिव्हा चालक दोघांवरही कारवाई केली जाईल. आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला अटक करण्यात आली आहे, दुर्दैवी घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती आणि पोलीस येईपर्यंत सिद्धार्थ सोनीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता आणि लोक किरकोळ कारणावरून घडलेल्या दुर्दैवी प्रकारावर शोक व्यक्त करताना दिसले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस