शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री फोन आला सकाळी मृतदेह दिसला; भादलीतील तरुणाचा खून? शरीरावर जखमा

By सुनील पाटील | Updated: August 10, 2022 15:20 IST

मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यावेळी तो घरातून बाहेर गेला. रात्री घरी परतलाच नाही.

जळगाव / नशिराबाद : रात्री साडे नऊ वाजता फोन आल्यानंतर घरातून बाहेर गेलेल्या संदेश लिलाधर आढाळे (वय २२, रा.भादली, ता.जळगाव मुळ रा.डोंगरकठोरा, ता.यावल) या तरुणाचा दुसऱ्या दिवशी सकाळी कडगाव शिवारात मृतदेहच आढळून आला आहे. संदेशच्या शरीरावर जखमी असून हा खुनाचाच प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी देखील त्याच दृष्टीने तपासाला गती दिली आहे.

या घटनेसंदर्भात पोलीस व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश आढाळे हाजळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यावेळी तो घरातून बाहेर गेला. रात्री घरी परतलाच नाही. बुधवारी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला. या घटेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सहायक फौजदार अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संदेश याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलवियात आला.

आरपीआयची चौकशीची मागणीया घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरपीआयचे महानगराध्यक्ष (आठवले गट) अनिल अडकमोल यांनी शासकीय रुग्णालय गाठून मृतदेहाची पाहणी केली. हा घातपाताचाच प्रकार असून रात्री आलेला तो कॉल कोणाचा होता. त्यानंतर पुढे काय झाले याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अडकमोल यांनी केली आहे. दरम्यान, घटनेचा तपास खुनाच्या दिशेनेच सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी दिली. संदेश याच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी