शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कॉल गर्लच्या हत्येची सुपारी फुटलीच नाही; रेकी करून तीन वेळा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 23:23 IST

पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

नागपूर - फ्लॅट बळकावून बसलेल्या एका कॉलगर्लची हत्या करण्यासाठी चार लाखांची सुपारी घेणाऱ्या चाैघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. भूपेंद्र मोहन गिल्लोरकर (वय ३२, रा. तुमसर), राहुल संतोष हलमारे (वय ३६, रा. हिवरीनगर), राजेश उर्फ राजा सुरेश गुंड (वय ३५), पूजा राजेश गुंड (वय २५, दोघेही रा.सोमवारी क्वॉर्टर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना सुपारी देणारा गणेश बर्वे नामक आरोपी फरार आहे. ही कॉलगर्ल वाडी भागात राहते.

वेश्याव्यवसाय करण्याच्या आरोपात पोलिसांनी तिच्याविरुद्ध तीन वेळा कारवाई केली आहे. तिने बर्वे याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. तो रिकामा करून देण्यास तिने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे चिडलेल्या बर्वे याने आरोपी गिल्लोरकर आणि हलमारेच्या माध्यमातून तिची हत्या करण्यासाठी आरोपी राजेश आणि पूजा गुंड यांना चार लाखांची सुपारी दिली होती. ती घराबाहेर पडताच तिला अंधारात गाठून लोखंडी रॉडने तिची हत्या करण्याचा कट आरोपींनी रचला होता. तशी रेकीही आरोपींनी केली होती. मात्र, तिने आरोपींना संधीच दिली नाही. तिला सुपारीची कुणकुण लागताच तिने वाडी ठाण्यात तक्रार नोंदवली.

बोंबाबोंब झाल्याने ती बचावली

सुपारी घेणाऱ्या आरोपींनी बोंबाबोंब केल्याने कर्णोपकर्णी ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांना कळली. त्यामुळे सोमवारीगुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, एपीआय सुनीत परतेकी, अनिल मेश्राम, पीएसआय मुक्तीराम चेवले, वसंता चाैरे, हवलदार विनोद देशमुख, राजेश कुरसंगे, सुशील श्रीवास, शरद चांभारे, हेमंत लोणारे, सुनील गुजर, सुशांत नंदेश्वर, सुशांत सोळंके, योगेश सेलूकर आणि दिगांबर दहातोंडे यांनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी सुपारीची रोकड अन् कटाची कबुली दिली असून, मुख्य सूत्रधार गणेश बर्वेचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर