शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉल गर्लच्या प्रेमात पडला सरकारी कर्मचारी, आता खावी लागतेय जेलची हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 08:42 IST

दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरू झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॉल गर्लने सरकारी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला अटक करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. दरम्यान, कॉल गर्ल आधी आझमगडहून प्रयागराजला आली होती, तिथे तिने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले आणि नंतर सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. दरम्यान, दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरू झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

सेक्स रॅकेटच्या व्यवसायात सहभागी असलेल्या एका तरुणीला आझमगड पोलिसांनी पकडले होते. काही दिवसांपूर्वी ही तरुणी प्रयागराजला आली होती. याठिकाणी तिने एका व्यक्तीशी लग्नही केले होते. त्यानंतर या तरुणीची आणि एका सरकारी कर्मचाऱ्याची भेट झाली. सरकारी कर्मचाऱ्याची तरुणीशी जवळीक वाढू लागली. यानंतर तरुणीने आपल्या पतीपासून दूर राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, सरकारी कर्मचारी या तरुणीच्या प्रेमात अडकला. यानंतर सरकारी कर्मचारी आणि तरुणीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.

दरम्यान, या सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. पत्नीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी तरुणी (कॉल गर्ल) तिथे पोहोचली आणि स्वतःला सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी म्हणवून घेऊ लागली. हे ऐकून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि या प्रकरणावरून वाद वाढला. यावेळी तरुणीने आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा लोकांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला.

दुसरीकडे, वाद वाढल्यावर सरकारी कर्मचाऱ्याने तरुणीपासून लांब राहण्यास सुरुवात केली. मात्र या तरुणीने त्याची पत्नी असल्याचा दावा केला होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर तरुणीने लूटमारसह आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. मात्र, या दोघांचे सत्य पोलिसांना माहीत होते. यादरम्यान  तरुणीने मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांना पत्र लिहून न्याय न मिळाल्यास धोकादायक पाऊल उचलू, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी