शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CAA : दर्यागंज हिंसाचार प्रकरणातील १५ आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:46 IST

दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले होते.

ठळक मुद्देदर्यागंज परिसरात हिंसाचार प्रकरणी यापूर्वी 15 आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दंगल भडकावणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA)  देशभरात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी २० डिसेंबरला राजधानी दिल्लीमधील हिंसाचारप्रकरणी काही नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनीअटक केले आहे.'भीम आर्मी'चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दर्यागंज भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनीअटक केली होती. परवानगी नसताना आझाद यांच्या संघटनेने जामा मशीद ते जंतरमंतर दरम्यान मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत आझाद मशिदीमध्ये शिरले होते. त्यानंतर शनिवारी २१ डिसेंबरला सकाळी मशिदीबाहेर येताच त्यांना अटक करण्यात आली होती. त्याआधी पोलिसांवर हल्ला करून हिंसाचार भडकविणाऱ्या १५ जणांना अटक करण्यात आली होती. महानगर दंडाधिकारी कपिल कुमार यांनी १५ जणांचा जामीन अर्ज फेटाळला असून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. 

निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलिसांना गुंगारा दिल्याबद्दल आझाद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, लोकांना भडकावणे आणि दंगल घडवून आणणे यांसारख्या वेगवेगळ्या कलमांतर्गत आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टासमोर आझाद यांना सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. दर्यागंज परिसरात हिंसाचार प्रकरणी यापूर्वी 15 आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलीस घटनास्थळाच्या आसपास असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दंगल भडकावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये सामील असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले होते. यामध्ये 13 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर एकाचा पाय मोडला आहे. तीन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्लीArrestअटकPoliceपोलिस