शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

...अन्यथा मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही; अश्विनीच्या माहेरच्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 06:56 IST

कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नंबर तीनमध्ये ‘नानूस वर्ल्ड’ या दुकानाचा मालक दीपक गायकवाड आपली पत्नी व मुलासह राहत होता.

कल्याण : आपल्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या करणारा व्यावसायिक दीपक गायकवाडला पोलिसांनी शनिवारी अटक केली. दीपक हा आपली पत्नी अश्विनीला माहेरून पैसे आणण्याकरिता दमदाटी करीत होता. तसेच पैसे आणले नाही तर मुलासह तुला ठार मारीन, अशी धमकी देत होता, ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दीपकने पत्नीला दिलेली धमकी खरी केली. निर्दयी दीपकला आमच्यासमोर आणा. ताेपर्यंत अश्विनी आणि आदिराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातलगांनी नकार दिला होता. तर दीपकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी केली.

कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नंबर तीनमध्ये ‘नानूस वर्ल्ड’ या दुकानाचा मालक दीपक गायकवाड आपली पत्नी व मुलासह राहत होता. दीपकवर कर्ज झाले होते व त्या कर्जाच्या बोजामुळे ताे मुलाची आणि पत्नीची हत्या करून पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपकला ताब्यात घेतले. दीपकची पत्नी अश्विनीचे कुटुंबीय कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शुक्रवारी रात्री जमले होते. या ठिकाणी सात वर्षांचा आदिराज आणि त्याची आई अश्विनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

आम्ही दीपकला वेळोवेळी पैसे दिले. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये दिले होते. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारून टाकणार, अशी धमकी दीपक द्यायचा. अश्विनीचा छळ करण्यात दीपक गायकवाड, आकाश सुरवडे, ज्योती दर्शन बागुल, सुनीता गायकवाड हे लोक सामील आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा. - विकी मोरे, अश्विनीचा भाऊ 

कोट्यवधींचे कर्जआरोपी दीपक गायकवाड याची कल्याणमध्ये नानूस वर्ल्ड ही खेळण्याची दुकाने विविध ठिकाणी आहेत. त्याच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. पैशाच्या कारणावरून तो पत्नीला घटस्फोट देणार होता. यावरून त्यांचे वाद सुरू होते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत  होती. शुक्रवारीही त्यांचे भांडणे झाले. त्यावेळी पत्नी अश्विनीने त्याची काॅलर पकडली. त्याचा राग दीपकला आला. त्याने रागाच्या भरात तिची गळा दाबून हत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी