शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक वादातून शेजाऱ्याचा दरवाजा पेटविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:35 IST

व्यावसायिक वादातून शेजा-याच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. स्थानिक आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत या कुटुंबाला वाचविल्याने जीवितहानी टळली.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : व्यावसायिक वादातून शेजा-याच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. स्थानिक आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत या कुटुंबाला वाचविल्याने जीवितहानी टळली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.चंदु सरवय्या आणि संजय सरवय्या अशी अटक दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार राजेश भुवालप्रताप गुप्ता (४३) हे हिरा कारागीर आहेत़ ते दहिसर पूर्वच्या रावळपाड्यातील श्यामनारायण दुबे चाळीत पत्नी मीरादेवी (४०) आणि दोन मुले धनंजय (१६), अनुज (१५) यांच्यासह राहतात. मीरादेवी या साडीला फॉल बिडिंग करण्याचे काम करतात. त्यासाठी नुकतीच त्यांनी शिलाई मशीनही खरेदी केली. तर चंदू याची पत्नी प्रफुला (४५) देखील हेच काम करते. मात्र मीरादेवीकडे मशीन असल्याने त्यांचे काम अधिक वेगाने होऊ लागले. त्यांची शिलाईदेखील कमी असल्याने ग्राहक त्यांच्याकडे जाऊ लागले. याचा फटका सरवय्या कुटुंबाला बसला. त्यावरून त्यांचे गुप्ता कुटुंबासोबत वादही होऊ लागले. अखेर राजेश यांनी पत्नी मीरादेवी यांना सरवय्या कुटुंबाशी संभाषण बंद करण्यास सांगितले.दरम्यान, २६ जानेवारीला फॉल बिडिंगच्या शिलाईवरून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. तेव्हा सरवय्या याने गुप्ता कुटुंबाला धमकी दिली. त्यानंतर २७ जानेवारीला गुप्ता कुटुंबीय झोपले असताना त्यांच्या दरवाजावर कोणीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून तो पेटवून दिला. मीरादेवी यांना जाग आली आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकल्याने राजेश तसेच त्यांची दोन मुलेही जागी होऊन मदत मागू लागली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पोलिसांचे एक पथकही तेथे दाखल झाले आणि दरवाजा तोडून गुप्ता कुटुंबाला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. गुप्ता कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चंदू आणि त्याचा नातेवाईक संजय यांच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी