शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! नर्सरीतील चिमुरडीवर बसचालकाचा बलात्कार; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 06:01 IST

साडेतीन वर्षांची ही चिमुरडी खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेनंतर ती घरी येत असताना ही घटना घडली.

भोपाळ : नर्सरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर शाळेच्या नराधम बसचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे घडली. पोलिसांनी चालकासह महिला सहायकाला अटक केली आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी घटना घडली तेव्हा ही महिला सहायक बसमध्ये होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

साडेतीन वर्षांची ही चिमुरडी खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेनंतर ती घरी येत असताना ही घटना घडली. मुलगी घरी आल्यानंतर कोणीतरी तिचे कपडे बदलल्याचे आईच्या लक्षात आले. आईने मुलीचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे याबाबत चौकशी केली. मात्र, दोघांनीही मुलीचे कपडे बदलल्याचा इन्कार केला. नंतर मुलीने गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. शाळेच्या बसचालकाने बसमध्ये अत्याचार केला आणि नंतर आपले कपडे बदलले, असे तिने पालकांना सांगितले. 

शाळेच्या भूमिकेची चौकशी : गृहमंत्रीतक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत विचारले असता शाळा प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी केली जाईल. शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे मलाही वाटते, असे ते म्हणाले.