शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजय कॉलनीमध्ये घरफोडी; ४ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

By सागर दुबे | Updated: April 7, 2023 15:33 IST

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.

जळगाव : विजय कॉलनीतील प्रसाद अपार्टमेंटमधील रहिवासी गणेश नारायण व्यास यांच्या बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.

प्रसाद अपार्टमेंट येथे गणेश व्यास हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला असून गुरूवारी दुपारी व्यास हे कामावर होते. तर कुटूंबिय खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेली.

मुलाचा कॉल आला, घराचा दरवाजा उघडा आहे...सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास व्यास यांचा मुलगा ध्रुव हा घरी आला. त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाट सुद्धा तुटलेले दिसले. हा प्रकार त्याने वडिलांना सांगून ताबडतोब घरी येण्यास सांगितले. व्यास हे घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले तर आतील खोलीतील कपाट, कपाटातील ड्रॉव्हर तुटलेले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे डबे बेडवर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच त्यांच्या पत्नीला घरी बोलवून घेतले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. रात्री व्यास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

असा आहे चोरीला गेलेला मुद्देमाल१ लाख ८० हजार रूपयांची रोकडसह ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगळपोत, ८० हजार रूपयांची सोन्याची चेन, ६० हजार रूपये किंमतीचे कानातील पैंडल, ८ हजार रूपये किंमतीची सोन्याची फुली, १२ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, २ हजार रूपये किंमतीची चांदीची साखळी, ८ हजार रूपये किंमतीचे चांदीचे शिक्के असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी