शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या हव्यासापोटी बिल्डर पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला ठाेकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:47 IST

मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल, अशी भीती पत्नी पूनमला होती.

नवी मुंबई : सीवूड येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येचा उलगडा करण्यात एनआरआय पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पत्नीला व तिच्या प्रियकराला बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत. बिल्डराचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने त्याची संपत्ती कधीही जप्त होण्याची भीती असल्याने या दोघांनी हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

सीवूड सेक्टर ४४ येथील बिल्डर मनोजकुमार सिंग (३९) याची शनिवारी हत्या झाली होती. कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेनंतर नवी मुंबईत खळबळ उडाली. मनोजकुमार याच्यावरही फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हत्येमागे आर्थिक वादाचे कारण आहे का? असा प्रश्न तपासादरम्यान निर्माण झाला होता.  मात्र, या हत्येमागे सिंग यांचाच कामगार व पत्नी असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

त्यानुसार दोघांना अटक केली आहे. सिंगच्या कार्यालयात काम करणारा राजू ऊर्फ शमसूल अबुहुरेरा खान (२२) याच्यासोबत पत्नी पूनम सिंगचे प्रेमसंबंध होते, असे उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तपास करणाऱ्या एनआरआय पोलिसांना राजूवर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. 

सीसीटीव्हीच्या डीव्हीआरचा शोध सुरू मनोजकुमार यांचा मृतदेह आढळल्यानंतर रात्री कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी के. कुमार नावाची व्यक्ती भेटायला येणार होती, असे पत्नी पूनम यांनी पोलिसांना कळवले होते. मात्र, त्यांचा यामध्ये अद्याप सहभाग उघड झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले; परंतु हत्येच्या घटनेनंतर मनोजकुमार यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांना मिळाला नाही. तो मिळाल्यानंतर हत्येचे चित्र स्पष्ट होणार असून तो मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

    मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल, अशी भीती पत्नी पूनमला होती.    राजूच्या मदतीने कट रचला. सिंग कार्यालयात असताना त्याच्या डोक्यात रॉड मारून हत्या करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी