शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतून पळालेला बांधकाम व्यावसायिक पुन्हा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:41 IST

बँक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

डोंबिवली : बँक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. रामनगर पोलिसांनी त्याला पुन्हा मुंबई विमानतळावरून अटक केली.जगदीश वाघ याने २०१२-१३ मध्ये दोन सदनिका आणि एक प्लॉट सीकेपी बँकेकडे गहाण ठेवून त्या बदल्यात सात कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने बँकेतर्फे मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, वाघने कर्ज न फेडताच बँकेकडे गहाण मालमत्ता परस्पर विक्री केल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानुसार, बँकेतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानुसार, जगदीश वाघ रामनगर पोलिसांच्या कोठडीत होता.रविवारी सकाळी ९च्या सुमारास वाघने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलीस त्याला पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या शौचालयाजवळ घेऊन गेले. त्यावेळी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत त्याने पोबारा केला. त्यानंतर, महाराष्ट्राबाहेर पळून जाण्यासाठी त्याने मुंबई विमानतळ गाठले. ही बाब बातमीदारांमार्फत रामनगर पोलिसांना कळताच, पोलिसांनी मुंबई विमानतळावरून वाघ याला ताब्यात घेतले. कोठडीतून पळून गेलेल्या वाघविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडेआरोपी जगदीश वाघ याला पुन्हा अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले असले, तरी पोलीस कोठडीतील आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील आरोपीबाबत पोलिसांची अशी भूमिका असेल, तर अन्य गुन्ह्यांतील आरोपींना किती सवलती दिल्या जात असतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Arrestअटकdombivaliडोंबिवली