शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानेच तक्रार देण्याची बिल्डरची झाली हिंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:01 IST

माणसाकडून आपल्याला व कुटुंबीयांना धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी या बिल्डरने केली आहे

जमीर काझीमुंबई : आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे खूप ताकदवान असल्याने  जेलमध्ये सडत बसावे लागण्याच्या  भीतीपोटी कोट्यवधीची खंडणी वसुली होऊनही गप्प राहिलो होतो, मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्याने  पोलीस यंत्रणा आपली फिर्याद घेईल, अशी खात्री पटल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याचे धाडस केल्याची कबुली तक्रारदार बिल्डरने दिली आहे. 

त्यांच्या माणसाकडून आपल्याला व कुटुंबीयांना धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी या बिल्डरने केली आहे. भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक व ठाण्यातील यूएलसी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या श्यामसुंदर अग्रवाल याने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह व इतरांविरुद्ध खंडणी वसुलीबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये त्याचा तत्कालीन व्यावसायिक भागीदार संजय पुनामिया यांचे सिंह यांच्याशी असलेले जवळचे संबंध, त्यांनी केलेली वसुली आणि परमबीर सिंह यांना मिळणाऱ्या पोस्टिंगबद्दल माहिती दिली आहे. परमबीर हे पुनामिया याच्या सांगण्यावरून आपल्याला खोटे गुन्हे दाखल करून ४, ५ वर्षे जेलमध्ये अडकवतील अशी भीती वाटत होती, त्यामुळे माझी, पुतण्यांची मोठ्या प्रमाणात लूट होऊन, ८ कोटींचा भूखंड १ कोटीला हडप करूनही आम्ही गप्प होतो. मात्र राज्य सरकारने मार्च महिन्यात त्यांची आयुक्तपदावरून बदली केली, त्यामुळे मुंबई पोलीस तक्रार नोंदवून घेतील, असा विश्वास वाटल्याचे अग्रवाल याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्या जबाबाच्या अनुषंगाने  कागदपत्रे, पुरावे तसेच २३ व ३० मार्च २०२१ रोजी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकींचे संभाषण रेकॉर्ड तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

पुनामियाला राजकीय वरदहस्तपोलिसांनी अटक केलेल्या बिल्डर व परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय संजय पुनामिया याचे राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याची नातेवाईक  आमदार असून ठाणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांचा त्याला वरदहस्त आहे. त्यामुळेच यूएलसी घोटाळ्याबद्दल ठाण्याची क्राइम ब्रँच करीत असलेला फेरतपास अडीच महिन्यांपासून सुरू असूनही आणि सबळ पुरावे असतानाही आतापर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग