नवी दिल्ली - दिल्लीतील टिळक नगर भागात एका तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत बेदम मारहाण करणार्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या तरुणाला शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणाचे नाव रोहित तोमर आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रोहितला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी दिल्ली पोलिसातील पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. प्रेयसीने लग्नासाठी बळजबर करत मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी रोहितला बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटले की अशा प्रकारचा व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला असून दिल्ली पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पाहा हृदयद्रावक व्हिडिओ