शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दुकलीला अटक, नालासोपारा परिसरातील कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 19:40 IST

पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा:- ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे. पेल्हार येथे दोघे ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आप्पा मैदान, नवजिवन शांतीनगर येथे येणार असल्याबाबतची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना यांना मिळाली होती. त्यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळविल्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि सोपान पाटील व अंमलदार असे पोलीस पथक तयार करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. 

सदर बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील,  गुन्हेप्रकटीकरण कक्षाचे सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखील मंडलिक, दिलदार शेख, सुजय पाटील यांनी आप्पा मैदान, नवजीवन येथे सापळा रचुन आरोपी अलीम इलाही सय्यद (२३) आणि उमेश राजाभाऊ सुर्यवंशी (२१) यांना ताब्यात घेतले. दोन पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यात २५.६०० ग्रॅम वजनाचा २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर अंमली पदार्थ मिळुन आला.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपारा