शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 21:30 IST

विवाहित बहिणीच्या घरात शिरून छेडखानी करणाऱ्या गुन्हेगाराला भावाने आपल्या साथीदाराच्या मदतीने संपविले. ही घटना गुरुवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली.

ठळक मुद्देस्टार बसच्या निलंबीत कंडक्टरला अटक : नागपूरच्या कळमनातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाहित बहिणीच्या घरात शिरून छेडखानी करणाऱ्या गुन्हेगाराला भावाने आपल्या साथीदाराच्या मदतीने संपविले. ही घटना गुरुवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली.पोलिसांनी खुनाचा सुत्रधार राजा पुंडलिक भारती (२०) रा. मिनिमातानगर यास अटक केली आहे. त्याचा साथीदार आकाश मेहता हा फरार आहे. मृत रोशन शंकर चौरसिया (२७) भिलगाव, वाठोडा हा आहे. रोशन कामठीत कोळश्याचा व्यवसाय करतो. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्या विरुद्ध खुनासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो मागील महिन्यापर्यंत मिनिमातानगरात राहत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन काही काळापासून राजाच्या विवाहित बहिणीला त्रास देत होता. तो त्याच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा दावा करीत होता. परंतु राजाची बहिणीने त्याचा इन्कार केला होता. त्यामुळे दोन्ही परिवारात तणाव सरु होता. महिनाभरापासून रोशन वाठोडात राहायला गेला होता. त्यानंतरही त्याचे मिनिमातानगरात येणे-जाणे सुरु होते. गुरुवारी रात्री रोशन राजाच्या बहिणीच्या घरी पोहोचला. तो दरवाजातून आत जात होता. त्याला पाहून राजाच्या बहिणीने आरडाओरड केली. राजा तेथे पोहोचला. रोशनला पाहून तो संतापला. त्याने रोशनशी वाद घातला. राजाला त्याच्या बहिणीने शांत केले. त्यावर रोशन तेथून निघुन गेला. राजाने ही घटना आकाश मेहताला सांगितली. आकाश राजाच्या बहिणीचा नातेवाईक आहे. दोघांनी रोशनला धडा शिकविण्याचे ठरविले. दोघांनी रोशनचा तपास सुरु केला. काही वेळानंतर रोशन त्यांना सापडला. त्यांनी चाकुने वार करून त्याचा खुन केला. घटनेची माहिती मिळताच कळमनाचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रोशनला मेयो रुग्णालयात पोहोचविले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राजाला अटक केली. रोशनच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. त्याला राजा संतापलेला असल्याची माहिती होती. तरीसुद्धा त्याने आपल्यावर संकट येईल हे ओखळले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून