शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रात्री भावाचे १५ मिसकाॅल आले होते; तरुणी नराधमांच्या जाळ्यात अडकली, सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:29 IST

भिवंडीतील घटना; सहा आरोपींवर गुन्हा दाखल, गुन्हेगारांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भावाला मारहाण करून बहिणीला रात्री फोनद्वारे खोटे कारण सांगून रात्रीच बोलावून घेत तिच्यावर दोन वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी अत्याचार केल्याची घटना गुरुवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

शांतीनगर परिसरातील फातमानगर परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणी शेलार येथे आतेबहिणीकडे गेली होती. रात्री तिला भावाचे १५ मिसकाॅल आले होते. १२ वाजता तिला अचानक जाग आली. तिने मोबाइलमधील मिसकाॅल बघून भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी भावाने, ‘माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये’ असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी ओळखीच्या रिक्षाचालकासोबत बागे फिरदौस येथे आली. तेथे दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू व इतर दोन जण (सर्व रा. फातमानगर) यांनी पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षाचालकास मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपांत पीडितेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

पीडिता, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकीएकदा बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला पुन्हा फातमानगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकावून पसार झाले. 

या घटनेनंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पहिला गुन्हा शांतीनगर पोलिस ठाण्यात घडला असल्याने तो शांतीनगर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग