मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा रंगली आहे. लग्नानंतर हनिमूनला गेलेला राजा आणि त्याची पत्नी सोनम शिलाँगमधून अचानक गायब झाले होते. मात्र काही दिवसांनी सोनमनेच राजाची हत्या केल्याचं समोर आलं. शिलाँग पोलिसांनी राजा रघुवंशीच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह सर्व मुख्य आरोपींना अटक केली आहे. हत्या प्रकरणातील तीन सह-आरोपींना जामीन मिळाला आहे.
राजाचा भाऊ विपिन शिलाँगला गेला. "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय" असा मोठा दावा भावाने केला. विपिन आणि त्याचं कुटुंब हे राजाची हत्या झाली त्या ठिकाणीही पोहोचले. विपिन रघुवंशी याने तेथे एक विशेष विधी केला. राजाचा आत्मा अजूनही भटकत असल्याने त्याला शांती मिळावी म्हणून पूजा केल्याचं त्याने म्हटलं आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. ते २३ मे रोजी गायब झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. ९ जून रोजी राजाची पत्नी सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशात सापडली. शिलाँग पोलिसांनी सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा आणि इतर आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कर्मी यांनाही अटक केली. नंतर इंदूरच्या फ्लॅट मालक लोकेंद्र तोमर, प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्स आणि गार्ड बलवीर यांनाही अटक करण्यात आली.
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
आतापर्यंत या हत्येप्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी लोकेंद्र तोमर, बलवीर आणि शिलोम जेम्स यांना जामीन मिळाला आहे. राजाच्या कुटुंबाने यावर नाराजी व्यक्त केली. राजाचा भाऊ विपिन रघुवंशी आरोपीच्या जामिनाला विरोध करण्यासाठी आणि नार्को टेस्टची मागणी करण्यासाठी शिलाँग उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
सोनम रघुवंशी २१ जूनपासून जेलमध्ये आहे, जेलमध्ये आता तिला एक महिना पूर्ण झाला आहे. एनडीटीव्हीला सूत्रांकडून सोनमशी संबंधित काही माहिती मिळाली आहे. गेल्या एका महिन्यापासून जेलमध्ये सोनमला भेटायला कोणीही आलेलं नाही, तिचा भाऊ, वडील, आई किंवा कोणीही ओळखीची व्यक्ती आलेली नाही. पण सोनमला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही, ती तिच्या कुटुंबातील सदस्यांची आठवणही काढत नाही. राजा रघुवंशीच्या हत्येबद्दल तिला अजिबात पश्चात्ताप नाही, ती जेलमध्ये कोणाशीही याबद्दल बोलत नाही.