शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आईसमोरच कोयत्याने वार करत भावाची हत्या; पालघर-सातपाटीत घरकुलाच्या वादातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:14 IST

साखरेपाडा येथे आरोपी सतीश पाटील हा लहान भाऊ चंद्रकांत पाटील (वय ३३) याच्यासह राहत होता.

पालघर : आईला मंजूर झालेले घरकुल कोणी बांधावे, यावरून झालेल्या भांडणात सख्ख्या भावावर आईसमोरच कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार माहीम गावातील साखरेपाडा येथे समोर आला आहे. सतीश जेठू पाटील (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यानंतर पसार झालेल्या सतीशला सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी ताब्यात घेतले.साखरेपाडा येथे आरोपी सतीश पाटील हा लहान भाऊ चंद्रकांत पाटील (वय ३३) याच्यासह राहत होता. जुन्या घरात एक आडवी भिंत घालून हे दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत होते. त्यांच्या आईचे घरकुल कोणी बांधावे यावरून दोन्ही भावांमध्ये मोठा वाद होता. त्यातच भाऊ आपल्या मुलाला आरोपीच्या घरी जाऊ देत नसल्याचा रागही उफाळून यायचा.

आईवरही उगारला कोयताबुधवारी दुपारी घरकुलावरून या दोन भावांमध्ये पुन्हा मोठा वाद झाला. या वेळी सतीश घरातील कोयता उचलून लहान भावाला मारण्यास धावला. तेव्हा हा वाद सोडवण्यासाठी पुढे होत आईने मुलाच्या हातातील कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.  मात्र आरोपीने आईच्या अंगावरच कोयता उगारत ‘तू बाजूला हो, नाहीतर तुलाही मारून टाकीन,’ असे धमकावले. आई घाबरून बाजूला झाल्यानंतर सतीशने आपल्या लहान भावाच्या मानेवर, पाठीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात भाऊ चंद्रकांत याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपीचा माग काढण्यास सातपाटी पोलिसांनी सुरुवात केली. शोधमोहिमेनंतर एका वाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर