शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकवरून आक्षेपार्ह्य व्हिडीओ प्रसारित; अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 13:02 IST

तरुणाने टिकटॉकसह इतर सोशल मीडियातून व्हिडीओ प्रसारित केले

अंबाजोगाई : धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडीओ तयार करून टिकटॉकवर प्रसारित केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील श्रीनाथ बालासाहेब केंद्रे या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.  श्रीनाथ केंद्रे याने ‘टिकटॉक’वरून काही धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडीओ स्वत: तयार करुन प्रसारित केले असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयास मिळाली होती. अधीक्षक कार्यालयाकडून याबाबत तपास करण्याच्या सूचना धारूर पोलीस ठाण्यास देण्यात आल्या होत्या. धारूर पोलिसांनी चौकशी केली असता श्रीनाथने टिकटॉकसह इतर सोशल मीडियातून प्रसारित केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस शिपाई परमेश्वर सुरेश वखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीनाथ केंद्रेवर धारूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुरेखा धस आणि धारूर पोलीस कर्मचारी स्टाफ यांनी पार पडली. लॉकडाऊननंतर आतापर्यंत बीड जिल्हात अफवा तसेच सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देश्याने सोशल मिडीया व इतर माध्यमातून पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारित पसरविणाऱ्यावर ६० व्यक्तींवर वेगवेगळे ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमBeedबीडArrestअटक