शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Bride Absconding: 17 लाख देऊन नवरी घेऊन आला तरुण; 15 दिवसांनी डोक्याला हात लावून बसलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:13 IST

Bride absconding, Robber Bride in Rajasthan: राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात एका लग्नाची गोष्ट चांगलीच चवीने चर्चिली जात आहे. एका तरुणासोबत धोका झाला आहे.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात एका लग्नाची गोष्ट चांगलीच चवीने चर्चिली जात आहे. एका तरुणासोबत धोका झाला आहे. बागोडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या तरुणाने १७ लाख रुपये देऊन २३ वर्षांच्या तरुणीशी मोठ्या थाटामाटात विवाह केला. घरी घेऊन आला, परंतू ही नववधू केवळ १५ दिवसच त्याच्यासोबत नांदली, आता हा तरुण डोक्याला हात लावून बसला आहे. 

पोलिसांनी आता लग्न जुळविणाऱ्या दलालाला अटक केली आहे. नववधू १५ दिवसांनी फरार झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हे लग्न झाले होते. हरिसिंहने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्न लावण्यासाठी दलालाने त्याच्याकडून १७ लाख रुपये घेतले होते. १५ दिवस नांदून नववधू माहेरी गेली होती, परंतू ती परत आलीच नाही. यामुळे आपल्यासोबत धोका झाल्याचे हरिसिंहला समजले आणि त्याने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी दलाल इंदू भाईला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इंदू भाई उर्फ ​​अंदूजी हा चालक आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले, तेथून आरोपीला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाशी लग्न झालेल्या तरुणीचे बनावट आधार कार्ड (आधार कार्ड) होते. नाव आणि पत्ता पडताळता आला नाही. वधूच्या फेक आयडीमध्ये तिचे नाव राधा असे लिहिल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत पोलिसांना नवरीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. फोटोच्या आधारे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. २ जूनला हरिसिंहने पोलिसांच तक्रार केली होती. सात महिने मुख्य आरोपी फरार होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली.

टॅग्स :marriageलग्न