शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित; जमादार बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:23 IST

पोलीस अधीक्षकांनी दिला दणका

हिंगोली. तालुक्यातील माळसेलू येथील तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाºया जमादारास बडतर्फ करून या घटनेनंतर आपणही अडकणार या भीतीने पोलीस निरीक्षकांनीही रजा टाकून पळ काढला. त्यामुळे त्यांनाही निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी काढले.

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील एका तक्रारदाराचे अतिक्रमण काढून देण्यासाठी जमादार नंदकुमार मस्के याने त्याच्याकडे २५ हजारांची लाच मागितली होती. यात २0 हजार रुपये पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्यासाठी तर पाच हजार रुपये स्वत:साठी मागितले होते. मात्र तक्रारदाराने घासाघीस केल्यानंतर दहा हजारांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. रविवारी माळसेलू शिवारात लाचलुचपतच्या पथकाने मस्केला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकाराची माहिती न देताच हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आजारी रजा टाकली. सध्या कोवीडच्या काळात ही बाब गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. जमादार मस्के याला थेट बडतर्फच करून टाकले तर सुडके यांना निलंबित केले आहे.

मस्केला जामीन आज जमादार मस्के यास हिंगोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये मस्के याच्या वतीने अ‍ॅड.मनीष साकळे यांनी जामीनाचा अर्ज दाखल केला. या अर्जावरील युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी जमादारास पंधरा हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसsuspensionनिलंबन