शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : शाहरुख खानच्या वाहनचालकाला NCBने पाठवले समन्स; झाडाझडती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:57 IST

NCB summons Shah Rukh Khan's driver : सध्या एनसीबी कार्यालयात किंग खानच्या वाहनचालकांची चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही. एआता लवकरच आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या बवाहनचालकाला चौकशीसाठी बोलावले. सध्या एनसीबी कार्यालयात किंग खानच्या वाहनचालकांची चौकशी सुरू आहे.आर्यन खान तुरुंगात आहेया प्रकरणात ही मोठी घडामोड आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही. एनसीबी किंग खानच्या वाहनचालकाला प्रश्न विचारत आहेत. हे प्रश्न आर्यन खानशी संबंधित आहेत. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.आर्यन खानला ८ ऑक्टोबर रोजी तुरुंगात हलवण्यात आले. हा दिवस होता त्याची आई गौरी खानचा वाढदिवस. आर्यन खानला न्यायालयाकडून जामीन मिळेल अशी खान कुटुंबियांना आशा होती. पण तसे घडले नाही. आर्यनला त्याच्या आईच्या वाढदिवशी रात्र तुरुंगात घालवावी लागली. आर्यनसह उर्वरित आरोपींचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला. आता लवकरच आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत.

आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी NCB ने त्याचा मित्र अरबाज खानसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर पकडले. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्स हौशी म्हणून ड्रग्ज  घेतल्याची कबुली दिली होती. त्याचा मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या बुटामध्ये चरस लपवला होता. आर्यनविरोधातील खटल्याविरोधात अनेक बॉलिवूड स्टार्सनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. सेलेब्स देखील गौरी-शाहरुखला भेटण्यासाठी मन्नतला जाताना दिसले आहेत.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खानDrugsअमली पदार्थ