शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:53 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

मुंबई: गेल्या सात महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ७१८ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी ६५४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. मोबाइल दिला नाही, अभ्यास करत नाही म्हणून ओरडल्याच्या रागातही मुले घर सोडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस लगेचच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करतात. दर दिवशी किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. 

रागाने घर सोडले अन् विकृताच्या जाळ्यात अडकला...  मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कान सारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेत आहेत; मात्र मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.   रागाने घर सोडणे चेंबूर मधील अल्पवयीन मुलाला महागात पडले.   वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे.    मुलाला विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले.  धक्कादायक बाब म्हणजे चार महिन्यात तीनवेळा  अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रेम प्रकरण अन् बरंच काहीबेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचेही प्रमाण अधिक आहे. तसेच काही प्रकरणात मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकार ठरताना दिसतात. तर, राजस्थान, गुजरात सारख्या काही ठिकाणी अल्पवयीन मुलींसह लग्नासाठीही तस्करी होण्याच्या घटनाही पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर येताना दिसतात. 

समुपदेशन करत कुटुंबीयांच्या ताब्यातपोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येते. पोलिसांच्या निर्भया पथकाद्वारे आतापर्यंत अनेक हरवलेल्या मुलींचा शोध घेत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी