शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोकलवर बाटलीफेक, अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 01:36 IST

ठाणे रेल्वेस्थानकातून सुटलेल्या डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात फेकलेल्या बाटलीने दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.

ठाणे  - ठाणे रेल्वेस्थानकातून सुटलेल्या डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात फेकलेल्या बाटलीने दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अखेर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करून, त्या परिसरातील नशेबाज आणि मद्यपींची धरपकड सुरू करत चौकशीला प्रारंभ केला आहे. बाटली फेकल्याने आणखी कोणी जखमी झाले असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.सीएसएमटी-डोंबिवली ही लोकल शुक्रवारी रात्री ठाण्यातून सुटली. ही लोकल ठाणे रेल्वेस्थानकातून पुढे जात नाही, तोच मागील बाजूस असलेल्या महिला डब्यावर कोणीतरी काचेची बाटली फेकली. ती बाटली डब्यात उभ्या असलेल्या डोंबिवलीतील आशा पाटील यांच्या डोक्यावर आदळून फुटली आणि बाटलीचे तुकडे होऊन त्यातील काही तुकडे त्यांच्या हाताला आणि लोकलमधील सहप्रवासी सुष्मिता गावकर यांच्याही हाताला लागले. या दोन्ही जखमी महिलांना कळवा रेल्वेस्थानकात उतरवून त्यांच्यावर ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही; मात्र पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत या घटनेची नोंद करून तपास सुरू केला होता. तक्रार दाखल करण्यासाठीही पोलिसांमार्फत प्रयत्न सुरू होते. अखेर, लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवलीतील आशा पाटील यांचे घर गाठले. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.लोकलवर बाटलीफेक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात मोहीम तीव्र करून नशेबाज आणि मद्यपींची धरपकड सुरू केली. शुक्रवारच्या या घटनेमध्ये लोकलमध्ये आणखी कोणाला दुखापत झाली असल्यास त्यांनी पुढे येऊ पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी