शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाेठे करायचा माझ्या आईचा सतत छळ, रेखा जरे यांच्या मुलाचे पोलिसांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 05:53 IST

Rekha Jare Murder Case : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून, पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल याने सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनात रुणाल जरे याने म्हटले आहे की, बोठे याचे आमच्या घरी नेहमी जाणे-येणे असायचे. तो माझी आई रेखा यांना नेहमी जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तू नाही तर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, असे बोलायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कुणीच त्याच्याविरोधात बोलत नव्हतो. माझ्या आईने यापूर्वी  त्याच्या विरोधात कोतवाली  पोलीस ठाण्यात अर्जही दिले आहेत. बोठे यानेच माझ्या आईचे हत्याकांड करून तो फरार झाला. बोठे अथवा त्याच्या हस्तकांपासून आम्हाला धोका आहे. 

बोठे गुंड प्रवृत्तीचा   जातेगाव घाटात माझ्या आईची हत्या झाली तेव्हा त्या ठिकाणी आजी सिंधूबाई व भाऊ कुणाल आईसोबत होते. हे दोघे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. बोठे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने आधीही आम्हाला संपवून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी रुग्णाल यांनी या निवेदनातून केली आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ दरम्यान याप्रकरणी अटक असलेल्या पाच आरोपींपैकी आदित्य सुधाकर चोळके व फिरोज राजू शेख यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर सागर उत्तम भिंगारदिवे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व ऋषीकेश ऊर्फ टप्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नाशिकमधील हॉटेलमध्ये लपला होता बोठे नगरमधून पसार झाल्यानंतर बोठे हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. ही बाब पोलिसांना समजली तेव्हा तेथे तत्काळ एक पथक पाठविण्यात आले. बोठे मात्र पोलीस दाखल होण्याच्या आधीच हॉटेलमधून पसार झाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर