शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Video : एकाच मुलीवर दोघांचे प्रेम; मित्राने केली मित्राची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 19:40 IST

प्रेमसंबंधातून लालबागच्या लाडूसम्राटमधील कामगाराची निर्घृण हत्या; आरोपी अटकेत

नालासोपारा - नालासोपारा येथील वालई पाडयात सापडलेल्या विकास बावधाने या तरुणाच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास करून अवघ्या ३६ तासात आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपी आणि मृत विकास या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम होते. दोघेही सातारा येथे राहणारे आहेत. मृत विकास हा ६ महिन्यांपूर्वी लालबाग येथील प्रसिद्ध लाडूसम्राट या हॉटेलमध्ये काम करायचा. आरोपीला प्रेमात विकासचा अडथळा वाटत असल्याने त्याचा काटा काढला अशी माहिती लोकमतशी बोलताना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी दिली. 

नालासोपारा पूर्वेकडील नालेश्वर नगर येथील वालईपाड्याच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी विकास बावधाने (वय १९) या तरुणाचा शीर आणि धड वेगवेगळ्या अवस्थेमधील मृतदेह सापडलेला होता. या मृतदेहाचे धड आणि शीर धारदार शस्त्राने कापून वेगळे फेकण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने विकासाचे शीर एका बॅगेत टाकले होते. तर शरीर जंगलात टाकले होते. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून त्याची ओळख पटली होती. 

ही निर्घृण हत्या असल्याने तुळींज पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक स्थापन केले होते. मृत विकास बावधाने हा मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात राहणारा होता. तो सहा महिन्यांपूर्वीच लालबागच्या लाडूसम्राट हॉटेलात कमला लागला होता. त्याचे नालासोपारा येथील नात्यातील एका मुलीवर प्रेम होते. या मुलीवर विश्वास बावधने (वय २२) हा देखील प्रेम करत होता. त्याला विकासचा अडथळा वाटत होता आणि त्यामुळे त्याने विकासची हत्या करण्याचा निर्णय़ घेतला. त्यासाठी त्याने साताऱ्याहूनच छोट्या तलवारीसारखा चाकू आणला होता. सोमवारी त्याने विकासला फोन करून नालासोपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी त्याला रिक्षात बसून वालई पाड्याच्या निर्जनस्थळी नेले आणि तेथे त्याची निर्घृण हत्या केली. 

पोलिसांनी लाडूसम्राट हॉटेलात देखील मृत विकासाबाबत चौकशी केली. पोलिसांच्या पथकाने कराड येथून आरोपी विश्वासला अटक केली आहे. या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का याचा पोलीस तपास करत आहेत. ही प्रेम प्रकरणातून झालेली हत्या असल्याची माहिती नालासोपारा विभागाचे उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी दिली. आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या पथकाने तपास करून अवघ्या ३६ तासाात आरोपीला गजाआड केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून