शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या जरीपटक्यातील खोदकामात हाडेच हाडे  : नागरिकांसह पोलिसही हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 20:17 IST

जरीपटक्यात रविवारी निर्माणाधीन इमारतीजवळ खोदकाम करताना दोन मानवी सांगाडे आढळले होते तर त्याच ठिकाणी सोमवारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हाडे आणि कपडे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतर्कवितर्क, उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यात रविवारी निर्माणाधीन इमारतीजवळ खोदकाम करताना दोन मानवी सांगाडे आढळले होते तर त्याच ठिकाणी सोमवारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हाडे आणि कपडे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.जरीपटका पोलीस ठाण्याजवळ बापुना बार आहे. या बारजवळ किशन शावरदास सहजवानी यांनी या इमारतीच्या मागच्या बाजूला रविवारी खोदकाम सुरू केले होते. दुपारी १ ते २ च्या दरम्यान तेथे खोदकाम करणाऱ्या मजुरांना मानवी सांगाडा दिसला. नंतर पुन्हा खोदकाम केले असता पुन्हा एक कवटी अन् हाडे आढळली. त्यामुळे सर्वच हादरले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून तहसीलदारांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू केले. त्याठिकाणी मानवी आणि प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हाडे सापडली. विशेष म्हणजे, मानवी हाडांसोबत कपडेही आढळल्याने पोलिसांसकट सारेच हादरले आहे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सोमवारी सकाळपासूनच खोदकाम करण्याच्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्यापरीने तर्क लावत होता. आरोपींनी काहींची हत्या करून त्यांना तेथे पुरले असावे, असा संशय अनेक जण व्यक्त करीत होते. यासंबंधाने परिमंडळ - ५ चे उपायुक्त नीलोत्पल यांनी लोकमतला सांगितले की, संबंधित प्रकार नेमका काय, त्याबाबत काही निष्कर्ष काढणे तूर्त शक्य नाही. बुधवारी या ठिकाणी पुन्हा इमारतीचे खोदकाम केले जाईल. त्यातून आणखी काय मिळते, रासायनिक विश्लेषकांकडून त्याबाबत काय अहवाल येतो, ते आम्ही बघणार आहोत. त्यानुसार पुढच्या कारवाईची रूपरेषा ठरवू, असे ते म्हणाले.

विविध तपास पथके कामी लागली खोदकामात हाडेच हाडे सापडत असल्याने तहसीलदार, पोलीस अन् नागरिक असे सारेच अचंबित झाले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस उपायुक्त निलोत्पल तसेच जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी लक्ष ठेवून होते. आजुबाजुच्यालाही विचारणा केली जात होती. सायंकाळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे जरीपटका ठाण्यात पोहचले. त्यांनी दिवसभरापासूनच्या घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आवश्यक निर्देश दिले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जरीपटका पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके कामी लागले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून