शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे दिले निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:41 IST

Bombay High granted relief consoles Rahul Gandhi : फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून  राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

मुंबई : २०१८ मध्ये राजस्थानमधील एका सभेत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अनेक वादग्रस्त विधाने केली. त्यावरून मुंबईतील भाजपच्या एका सदस्याने राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी कारवाई करीत राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून  राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला २० डिसेंबरपर्यंत मानहानीच्या खटल्यात कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे सदस्य महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची दखल घेत दंडाधिकारींनी २८ ऑगस्ट २०१९ मध्ये फौजदारी कार्यवाही करीत राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. 

१२ जुलै रोजी न्यायालयाने बजावलेले समन्स मिळाल्यानंतर आपल्याला या दाव्याबाबत समजले. तोपर्यंत या दाव्याबाबत आपल्याला काहीच माहित नव्हते, असे राहुल गांधी यांनी याचिकेत म्हटले होते. या याचिकेवरील सुनावणी न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे होती. मात्र, राहुल गांधी यांचे वकील सुदीप पासबोला सुनावणीसाठी हजर नसल्याने न्यायालयाने या याचिकेवर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  ‘कमांडर-इन-थीफ, चौकीदार चोर है, चोरो का सरदार,’ अशी टीका केली होती. त्यामुळे मोदी यांच्यासह भाजप आणि त्यांच्या सदस्यांची प्रतिमा देशभरात मलिन केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHigh Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदी