शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:22 IST

पेडर रोड परिसरात राहणारे विराज विक्रम शहा (वय ४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट चिराग बामबोटसह एका महिलेविरुद्ध सहा कोटी १५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. पेडर रोड परिसरात राहणारे विराज विक्रम शहा (वय ४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

त्यांचा इंडस्ट्रिअल केमिकल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, चिराग बामबोट, राकेश शिवा शेट्टी, शेट्टी यांची पत्नी तमसीन शेख आणि अन्य साथीदारांनी चिरागच्या मे. आर्ट बाय चिराग बामबोट एल.एल.पी. या फर्ममध्ये २५ टक्के भागीदारी देतो असे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास सांगितले. यामध्ये त्यांनी एकूण सहा कोटी १५ लाख रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणूक केलेल्या रकमेचा वापर व्यवसायासाठी न करता त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. 

२६ मार्च २०२४ रोजी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार अर्ज सादर केला. त्यानुसार, दिलेल्या जबाबानुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये मे. हेवी केमिकल्स काॅर्पोरेशन या फर्मच्या कार्यालयाचे इंटेरिअरचे काम मित्र डरायस बामबोट यांना दिले होते. डरायसने त्यांचा भाऊ चिराग हा मेकअप अर्टिस्ट असून, त्याचा कोविडमुळे व्यवसाय तोट्यात गेला आहे. त्यामुळे चिरागने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगून, त्याला आर्थिक मदतीबाबत विचारणा केली. त्यानुसार त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये चिरागची भेट घेत मदत करण्याचे ठरवत गुंतवणूक करत गेले, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अशी केली फसवणूकचिरागने स्किन ट्रिटमेंटचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये शेट्टीची भेट घेतली होती. त्यावेळी चिरागने या व्यवसायात शेट्टी यांचा हातखंडा असून, हा व्यवसाय तेच पाहतील असे सांगितले. स्किन ट्रिटमेंटच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन, इंटेरिअर आणि इतर गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम जवळ नसल्याने हेवी केमिकल्स या भागीदारी फर्मच्या नावावर बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून सहा कोटी ४७ लाख ९१ लाख १५६ रुपयांचे कर्ज घेत पैसे दिले. स्किन ट्रिटमेंट व्यवसायासाठी फेब्रुवारी ते जुलै २०२३ या कालावधीत मे. हेवी केमिकल्स काॅर्पोरेशन या भागीदारी फर्मने चिराग व तमसीन  यांच्या भागीदारी फर्ममध्ये ६ कोटी १५ लाख रुपये  दिले. मात्र, पुढे ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी