शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:07 IST

शंकेखोर पतीने झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना मानकापूरच्या जयदुर्गानगर सोसायटीत घडली.

ठळक मुद्देमानकापुरातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शंकेखोर पतीने झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना मानकापूरच्या जयदुर्गानगर सोसायटीत घडली.सूरज यादव (५०) रा. गाडरवाडा, मध्यप्रदेश असे या शंकेखोर पतीचे नाव आहे. तो मजुरी करतो. त्याचे ३० वर्षाच्या लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते. १२ वर्षांपासून तो लक्ष्मीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतो. काही दिवसांपासून दोघे जयदुर्गानगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या परिसरात झोपडीत राहतात. यादव रागीट आणि शंकेखोर आहे. तो नेहमीच लक्ष्मीशी वाद घालत होता. त्याला तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. काही दिवसापासून तो तिला त्रास देत होता. २९ जानेवारीला सकाळी मोबाईलवरून दोघात वाद झाला. यादवने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे लक्ष्मी त्यावेळी शांत राहिली. रात्री २.३० वाजता लक्ष्मी झोपडीत झोपली होती. यादवने झोपेतच तिच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यात लक्ष्मी गंभीररीत्या भाजली. तिला त्याच अवस्थेत सोडून तो पळून गेला. लक्ष्मीची आरडाओरड ऐकू न परिसरातील नागरिक तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात पोहोचविले. या प्रकरणी यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसा