शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाच्या जमिनीसाठी केला बोगस कारभार, एसडीओच्या नावाने काढला एनएचा बनावट आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:08 IST

Crime News: महाविद्यालयासाठी शेतीच्या जमीनीला अकृषक दाखविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांचे खोटे आदेश काढण्यात आले. यासाठी बोगस सही, शिक्का मारणाऱ्यावर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदिया - महाविद्यालयासाठी शेतीच्या जमीनीला अकृषक दाखविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांचे खोटे आदेश काढण्यात आले. यासाठी बोगस सही, शिक्का मारणाऱ्यावर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सडक-अर्जुनी येथे के. एच. प्रशासकिय महाविद्यालय सुरू करण्यासाठी हा बोगसपणा करण्यात आला. नवप्रवर्तन सामाजिक बहुउददेशिक शिक्षण संस्थेतर्फे हे महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सन २०१७ पासून आरोपी रोशन डोमाजी जांभूळकर (५२) याने गट क. १७६/२/११ आराजी ००.६० हे. आर ही शारदाबाई अशोक लांजेवार रा. सडक/अर्जुनी यांच्या नावाने असलेली जमीन स्वत:चे नावे असल्याचे दाखविले. त्या जमिनीचा सातबारा व गाव नमुना ८ तसेच उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव यांच्या नावाचे खोटे व बनावटी आदेश पत्र, गोल शिक्का त्यावर बनावटी सही करून या जागेचा अकृषक आदेश तयार केला.नवप्रवर्तन सामाजिक बहुउददेशिक शिक्षण संस्थेव्दारे संचालीत के. एच. प्रशासकिय महाविद्यालय सडक अर्जुनी या शाळेला मंजुरी मिळावी म्हणून आरोपीने एसडीओचे खोटे प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयाचे मंजुरी करीता मंत्रालय मुंबई येथे पाठविले. जांभूळकर याने सन २०१७ पासून आजपर्यंत शासनाची फसवूक केली. सडक-अर्जुनी येथील मंडळ अधिकारी ब्रिजलाल दौलत वरखडे (५५) रा. मामा चौक, नुतन हायस्कुल जवळ गोंदिया यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी