शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला गेलेल्या कशेळीच्या वृद्धाचा मृतदेह मिळाला ठाण्याच्या तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 15:45 IST

आत्महत्येचीही शक्यता: नौपाडा पोलीस ठाण्यात नोंद

लोेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: शनिवारी घरातून फिरायला गेलेल्या कशेळी येथील ७५ वर्षीय विठ्ठल गोविंद देशमुख या वृद्धाचा मृतदेह ठाण्याच्या कचराळी तलावामध्ये रविवारी सकाळी आढळला. या तलावात त्यांनी आत्महत्या केली की ते तोल जाऊन पडले, याबाबत मात्र तर्कवितर्क केले जात असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील कशेळी भागात राहणारे देशमुख हे पूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी भागात वास्तव्याला होते. 

नेहमीप्रमाणे ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. दुपारी एक वाजेपर्यंत घरी परतणारे वडिल घरी न आल्यामुळे देशमुख यांच्या मुलांनी नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत ते हरविल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, १० आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाचपाखाडीतील कचराळी तलावात तरंगतांना आढळला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिसांनी याठिकाणी बचावकार्य राबवून हा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशातील प्लास्टीकच्या पाकिटातील एका डायरीच्या आधारे त्यांची ओळख पटली. त्यांना दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. नेहमी फिरायला जाणारे देशमुख हे त्यांच्या पाचपाखाडीतील जुन्या घरीही नेहमी येत असत. ते कशेळीतीन ओंकार गॅलेक्सी या इमारतीमध्ये वास्तव्याला होते. ते कचराळी तलावात नेमकी कसे पडले? याचा मात्र उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लामखेडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी